Mahesh Gaikwad
निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. दररोज किमान ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
पुरेशी झोप घेणे आरोग्यासाठी चांगले असले, तरी जास्त झोपणेही आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. पाहूयात याबद्दलची माहिती.
प्रौढ व्यक्तींनी दररोज किमान ७-८ तास झोप आरोग्यासाठी आवश्यक असते. पुरेशी झोप घेतल्यामुळे मूड फ्रेश राहतो आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.
चांगली झोप घेतल्यामुळे शरीराला विषाणू आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत मिळते.
पुरेशी झोप घेतल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. तसेच यामुळे मानसिक तणाव कमी होतो.
पण, ९ तासांहून अधिक तास झोपण्याची सवयीमुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
जास्त वेळ झोपण्यामुळे मधुमेहासह ह्रदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते.
मानसिक तणाव, कामाचा अतिताण किंवा शारीरिक आजारांमुळे जास्त झोप लागू शकते.