Anuradha Vipat
कडुलिंबाच्या पानांचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. कडुलिंब हे एक औषधी वनस्पती आहे, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत.
कडुलिंबाचा वापर मुरुम, डाग, टॅनिंग आणि त्वचेच्या इतर समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते.
कडुलिंब आतड्यांतील जंतांवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे.
कडुलिंबाचा उपयोग सर्दी, खोकला आणि घसादुखी कमी करण्यासाठी होतो.
कडुलिंबाचे सेवन यकृताचे कार्य सुधारण्यास आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.
कडुलिंबाच्या पानांमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते