Anuradha Vipat
फळांवर मीठ किंवा चाट मसाला टाकून खाणे चवीसाठी उत्तम असले तरी आरोग्याच्या दृष्टीने ते पूर्णपणे अयोग्य मानले जाते.
फळांची स्वतःची एक नैसर्गिक चव आणि पोषण मूल्य असते. त्यावर अतिरिक्त मीठ किंवा मसाला टाकल्यामुळे फळांमधील पोषक तत्वे नष्ट होतात .
चाट मसाला आणि पांढऱ्या मिठामध्ये सोडिअमचे प्रमाण खूप जास्त असते. फळांवर मीठ टाकल्याने शरीरातील सोडिअमची पातळी अचानक वाढते.
नियमितपणे मिठासह फळे खाल्ल्यास किडनीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
जास्त मिठाच्या वापरामुळे शरीरातील पेशींमध्ये पाणी साठून राहते , ज्यामुळे हात-पायांवर किंवा चेहऱ्यावर सूज येणे, वजन वाढणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
आयुर्वेदानुसार, फळांचा नैसर्गिक गुणधर्म मधुर किंवा आम्ल असतो. त्यावर खारट मीठ किंवा तीखट मसाले टाकल्याने पोटातील नैसर्गिक पाचक रसांचे संतुलन बिघडते.
जर तुम्हाला फळांची चव वाढवायचीच असेल, तर पांढरे मीठ किंवा चाट मसाल्याऐवजी अगदी नाममात्र प्रमाणात काळे मीठ किंवा सेंधवं मीठ वापरू शकता.