Anuradha Vipat
दिलीप जोशी यांनी जिममध्ये न जाता फक्त ४५ दिवसांत १६ किलो वजन कमी केले आहे
दिलीप जोशी यांनी हे वजन कमी करण्यासाठी मरीन ड्राइव्हवर धावण्याचा (जॉगिंग) आणि पोहण्याचा व्यायाम केला.
दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते ऑफिसमधून परतल्यावर स्कूटर पार्क करायचे आणि मरीन ड्राइव्हवर ४५ मिनिटे जॉग करायचे.
पुढे त्यांनी सांगितले की, ते ऑफिसमधून आल्यावर क्लबमध्ये कपडे बदलून मरीन ड्राइव्हवर धावायला जायचे. ह्या व्यायामामुळे त्यांचे वजन कमी झाले.
पुढे दिलीप जोशी यांनी असेही सांगितले की अभिनेता होण्यापूर्वी त्यांनी पाच वर्षे एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केले होते.
तुम्हालाही दिलीप जोशी याच्यासारखे वजन कमी करायचे असले तर व्यायाम हा एकमेव आरोग्यादायी पर्याय असू शकतो
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नसेल, तर तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेणे चांगले राहील