Aslam Abdul Shanedivan
फळांचे नियमित सेवन केल्यामुळे वेगवेगळी जीवनसत्त्वे शरीरास मिळतात. फळे ही चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात
सफरचंद, टरबूज, अंजीर, डाळिंब, पपई आदी फळे उपाशीपोटी खाल्ली तर त्याचा शरीराला चांगला लाभ होतो
संत्री, मोसंबी, पेरू आदी फळे ही आम्लयुक्त असतात. ती उपाशीपोटी खाणे टाळावे. ही फळे खाल्ली, तर अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
पेरू, बोरे या फळांमध्ये अधिक प्रमाणात आम्ल असते. त्यामुळे उपाशीपोटी ही फळे खाल्ली की, छातीत जळजळ होते. पोटाचा त्रास होतो.
आंब्यात अधिक प्रमाणात साखर असते. त्यामुळे शुगर असलेल्या व्यक्तींनी उपाशीपोटी या फळाचे अधिक प्रमाणात सेवन करू नये.
संत्री, मोसंबी आणि अनन आम्ल आणि व्हिटॅमिन सीचे अधिक असते. त्यामुळे ही फळे उपाशीपोटी खाणे टाळावे.
आंबट द्राक्ष उपाशीपोटी खाणेही शारीरिक त्रास वाढविणारे ठरते.