Animal Disease : मूतखडा मानवाप्रमाणे पशूंमध्ये देखील आढळतो, असा करा उपाय

Aslam Abdul Shanedivan

पशूंमध्ये मूतखडा

मानवाप्रमाणेच पशूंमध्ये मूतखडा देखील आढळतो. पशूंमध्ये हा आजार प्रामुख्याने खाद्यामध्ये असलेल्या ऑक्झिलेट, इस्ट्रोजन आणि सिलिकामुळे होऊ शकतो.

Animal Disease | Agrowon

अपायकारक खनिजद्रव्ये

जनावरांच्या चाऱ्यातील अतिरिक्त अपायकारक द्रव्ये आणि शरीरातील अपायकारक खनिजद्रव्ये साठत राहिल्याने मूतखडा तयार होतो.

Animal Disease | Agrowon

मूत्रसंसंस्थेत अडथळा

यामुळे मूत्रसंसंस्थेत अडथळा निर्माण होऊन जनावराच्या शरीरावर याचे गंभीर परिणाम होतात.

Animal Disease | Agrowon

कठीण स्फटिक

मूतखडा हे कठीण स्फटिक आहे. प्रामुख्याने ॲपटाईट, मॅग्नेशिअम कॅल्शिअम फॉस्फेट, कॅल्शिअम कार्बोनेट, सिलिकेट, कॅल्शिअम ऑक्सालेटचे कठीण स्फटिक असतात.

Animal Disease | Agrowon

मूतखडा होण्याची कारणे

मूतखडा हा प्रमुख्याने वयस्क बोकड, मेंढा, गुरे, रेडा यांच्यामध्ये आढळतो. नर पशूमध्ये शरीर रचना शास्त्राप्रमाणे मूत्राशयाची नलिका लहान असल्यामुळे मूतखडा झाल्यास लघवी कमी बाहेर पडते.

Animal Disease | Agrowon

मूत्र नलिकेला छिद्र

जास्त काळ असल्यास लघवी मूत्राशयाची पिशवीमध्ये जमा होऊन मूत्राशयाची पिशवी फुटू शकते किंवा मूत्र नलिकेला छिद्र पडू शकते.

Animal Disease | Agrowon

पिण्याच्या पाण्यातील क्षार

पिण्याच्या पाण्यात जास्त प्रमाणात असलेले क्षार देखील आजारास कारणीभूत ठरतात.

Animal Disease | Agrowon

Government scheme : आता वनहक्क धारकांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार