Aslam Abdul Shanedivan
आपल्याकडे एखादे शुभ काम करण्याआधी दही चारले जाते. यामागे काम थंड डोक्याने होते असे म्हणतात.
याचाच अर्थ दह्यातील लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया शरीरातील तणाव नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
दह्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. जळजळ, वजन वाढणे आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होण्यास मदत होते
तसेच दह्याचे सेवन मानसिक आरोग्य राखतो आणि ते योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतो.\
प्रोबायोटिक्ससाठी दही हा एक चांगला स्त्रोत असून किमची, लोणचे, केफिर आणि काही प्रकारचे चीज दह्यासोबत खाता येतं
तर दह्याचे सेवन केल्याने आतडे निरोगी होण्यास मदत मिळते
दह्याचे सेवनाने जरी नैराश्य आणि चिंतेपासून आराम मिळत असला तरिही त्यासाठी झोप आणि ध्यान फार महत्वाचे आहे.