AC Tractor : भारतातही मिळतात AC ट्रॅक्टर ; जाणून घ्या किंमत

Mahesh Gaikwad

भीषण गरमी

गेल्या काही वर्षांमध्ये तापमानाचा पार सातत्याने वाढत आहे. अशा भीषण गरमीमध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये ट्रॅक्टर चालवणे म्हणजे महाकठीण काम आहे.

AC Tractor | Agrowon

इंजिनाची उष्णता

वरून आग ओकणारा सुर्य आणि ट्रॅक्टरच्या इंजिनाची उष्णता अशा भयंकर गरमीमध्ये शेतकरी शेतात राबत असतो.

AC Tractor | Agrowon

शेतातील काम सुसह्य

भीषण गरमीमध्ये शेतकऱ्यांना शेतात काम करणे सुसह्य व्हावे, यासाठी आता वातानुकूलित ट्रॅक्टर बाजारात आले आहेत.

AC Tractor | Agrowon

AC ट्रॅक्टर

मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र असलेले सधन शेतकरी आता AC ट्रॅक्टर खरेदी करू लागले आहेत.

AC Tractor | Agrowon

वातानुकूलित ट्रॅक्टर

आज आम्ही तुम्हाला भारतात मिळणाऱ्या वातानुकूलित ट्रॅक्टरची माहिती आणि त्यांच्या किमतीबद्दल सांगणार आहोत.

AC Tractor | Agrowon

भारतीय AC ट्रॅक्टर

महिंद्रा अर्जुन नोवो ६०५ डीआय-आय हा भारतीय बनावटीचा AC ट्रॅक्टर आहे. हा ५७ एचपी ट्रॅक्टर असून 2WD आणि 4WD या दोन प्रकारांमध्ये येतो.

AC Tractor | Agrowon

AC केबिन

भारतीय बाजारामध्ये याची किंमत ११ लाख ५० हजार ते १२ लाख २५ हजार रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

AC Tractor | Agrowon

जॉन डियर

जॉन डियर ६१२०-बी हा सुध्दा एक AC केबिन असणारा ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर १२० एचपी, ४ सिलेंडर इंजिनसह येतो.

AC Tractor | Agrowon

AC ट्रॅक्टर किंमत

या ट्रॅक्टरची एक्स-शोरूम किंमत ३४ लाख ४५ हजार ते ३५ लाख ९३ हजार रुपये इतकी आहे.

AC Tractor | Agrowon
Tractor Sale | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....