Snake Free State : भारतातलं असं राज्य जिथं आढळत नाही साप

Mahesh Gaikwad

प्राण्यांच्या प्रजाती

जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातीमध्ये सापाला धोकादायक प्रजाती आहे. भारतात विविध प्रकारच्या सापाच्या प्रजाती आढळतात.

Snake Free State | Agrowon

सापांच्या प्रजाती

भारतातील वेगवेगळ्या भागात तेथील वातावरणानुसार सापांच्या प्रजाती पाहायला मिळतात. यामध्ये काही विषारी तर काही बिनविषारी आहेत.

Snake Free State | Agrowon

विषारी साप

भारतात जवळपास ३५० हून अधिक सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. यापैकी १७ सापांच्या प्रजाती विषारी आहेत.

Snake Free State | Agrowon

भारतात आढळणारे साप

भारतात केरळमध्ये सर्वाधिक सापांच्या प्रजाती आढळतात. पण भारतातले एक राज्य असे आहे, जेथे एकही साप आढळत नाही. याबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

Snake Free State | Agrowon

स्नेक फ्री स्टेट

'पगदंडी सफारी'च्या रिपोर्टनुसार, भारतातील केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा असलेल्या लक्षद्विपमध्ये एकही साप आढळत नाही.

Snake Free State | Agrowon

रेबीज फ्री स्टेट

लक्षद्विपमध्ये साप तर आढळतच नाहीत, परंतु येथे कुत्रेदेखील आढळत नसल्याने या राज्याला रेबीज फ्री स्टेट म्हणूनही ओळखले जाते.

Snake Free State | Agrowon

समुद्री पर्यटन

भारत-मालदीव वादानंतर खऱ्या अर्थाने लक्षद्विप चर्चेत आले. लक्षद्विप हा ३६ बेटांचा समहू असून येथील १० बेटांवरच मानवी वास्तव्य आहे.

Snake Free State | Agrowon