Tej Patta : देशातील 'या' ३ राज्यात होतं तमालपत्राचं ९९ टक्के उत्पादन

Mahesh Gaikwad

गरम मसाले

नॉनव्हेज जेवणात गरम मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या मसाल्यांतील तमालपत्राशिवाय मांसाहारी जेवणाला चव येत नाही.

Tej Patta | Agrowon

मसाला पिकांचे उत्पादन

भारतात मोठ्या प्रमाणावर मसाला पिकांचे उत्पादन होते. यामध्ये देशातील ३ राज्ये अशी आहेत, जिथे ९९ टक्के तमालपत्राचे उत्पादन होते.

Tej Patta | Agrowon

मेघालय

देशात तमालपत्राचे सर्वाधिक उत्पादन मेघालयमध्ये होते. एका वर्षात ४.२३ हजार टन तमालपत्र उत्पादित होते. जे देशातील एकूण उत्पादनाच्या ७०.२६ टक्के आहे.

Tej Patta | Agrowon

पश्चिम बंगाल

तमालपत्राच्या उत्पादनात पश्चिम बंगालचा दुसरा क्रमांक लागतो. येथे एका वर्षात १.४९ हजार टन तमालपत्राचे उत्पादन होते. जे संपूर्ण उत्पादनाच्या २४.७५ टक्के आहे.

Tej Patta | Agrowon

उत्तराखंड

तर सर्वाधिक तमालपत्र उत्पादनाच्या बाबतीत उत्तराखंड राज्य तिसऱ्या स्थानी आहे. उत्तराखंडमध्ये ०.२२ हजार टन तमालपत्र उत्पादित होते. देशातील एकूण तमालपत्र उत्पादनात उत्तराखंडचा वाटा ३.६५ टक्के आहे.

Tej Patta | Agrowon

महाराष्ट्र

महाराष्ट्रातही तमालपत्राचे उत्पादन होते. महाराष्ट्रात ०.०२ हजार टन तमालपत्राचे उत्पादन होते. जे एकूण उत्पादनाच्या ०.३३ टक्के इतके आहे.

Tej Patta | Agrowon

कर्नाटक

महाराष्ट्रापाठोपाठ तमालपत्र उत्पादनात कर्नाटकचा पांचवा क्रमांक लागतो. कर्नाटकात एका वर्षांत ०.०१ हजार टन तमालपत्र उत्पादित होते. देशातील तमालपत्र उत्पादनात कर्नाटकचा वाटा ०.१७ टक्के इतका आहे.

Tej Patta | Agrowon