Sainath Jadhav
पनीर टिक्का हा चविष्ट पदार्थ प्रथिनांनी समृद्ध आहे. पनीर आणि मसाल्यांचा वापर करून हा पदार्थ ग्रिलवर बनवला जातो.
चिकन समोसा तळलेला असला तरी त्यात चिकनमुळे प्रथिने भरपूर असतात. चटणीसोबत खाल्ला तर त्याची चव आणखी खुलते.
मूग डाळ वडा हा कुरकुरीत आणि प्रथिनांनी युक्त पदार्थ आहे. मूग डाळ आणि मसाले मिसळून हा वडा तळला जातो.
चणे चाटमध्ये काबुली चणे आणि मसाले एकत्र केले जातात. हा पदार्थ प्रथिनांनी समृद्ध आणि पौष्टिक आहे.
अंड्याची भुर्जी हा झटपट बनणारा आणि प्रथिनांनी युक्त पदार्थ आहे. कांदा, टोमॅटो आणि मसाले घालून हा पदार्थ पावसोबत खाल्ला जातो.
सोया चाप हा प्रथिनांनी भरलेला आणि चविष्ट जंक फूड आहे. मसाल्यांमध्ये मॅरीनेट करून तो ग्रिल किंवा तळला जातो.
मटार कचोरीत हिरव्या मटारमुळे प्रथिने मिळतात. कुरकुरीत कचोरी चटणीसोबत खाल्ल्यावर मजा येते.
भेलपुरीत मुरमुरे आणि चण्यांमुळे प्रथिने मिळतात. चटपटीत चटणी आणि भाज्यांसह हा पदार्थ हलका आणि पौष्टिक आहे.