Mahesh Gaikwad
किवी हे चिकूसारखे दिसरणारे आणि हिरव्या गराचे फळ आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात.
किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटमिन्स-सी असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी खोकल्या सारख्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होते.
किवीमध्ये नैसर्गिक फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ असतात, जे पचनक्रिया सुधारतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते.
नियमित किवीचे फळ खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. तसेच रक्तदाबही संतुलित राहतो, त्यामुळे हृदय निरोगी राहते.
किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि सेरोटोनिन असतात, ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते.
किवीमध्ये व्हिटॅमिन-ई आणि सी हे पोषक घटक असतात, जे त्वचा ताजीतवानी ठेवण्यास मदत करतात. तसेच केसांचे आरोग्यही सुधारतात.
किवीचे सेवन केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. यामुळे संभाव्य दृष्टिदोष टाळू शकता.
किवीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील हानिकारक पेशींचा नाश होतो आणि कॅन्सरचा धोका कमी होतो. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.