Vitthal Mandir : विठुरायाच्या मंदिराचं ७०० वर्षांपूर्वीचं पुरातन रूप आलं समोर

Mahesh Gaikwad

विठ्ठल रुक्मिणी मंदीर

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे.

Vitthal Mandir Conservation | Agrowon

मंदीर संवर्धन

मंदिराच्या संवर्धानाच्या काम करताना मंदिरात नव्याने करण्यात आलेले बांधकाम काढण्यात आले आहे.

Vitthal Mandir Conservation | Agrowon

गाभाऱ्यातील चांदी

विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यातील चांदी काढण्यात आली असून ग्रॅनाईटचे बांधकामही काढण्यात आले आहे. त्यामुळे ७०० वर्षांपूर्वीचे मंदिराचे पुरातन रूप समोर आले आहे.

Vitthal Mandir Conservation | Agrowon

मंदिरातील कोरीव काम

मंदिरातील गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी येथील फरशीसुध्दा काढण्यात आली असून मंदिराच्या आतील भागातील नक्षीकाम आणि कोरीव मुर्त्यांचे रूपही समोर आले आहे.

Vitthal Mandir Conservation | Agrowon

मंदिराचे पुरातन रूप

मंदिराचे ७०० वर्षांपूर्वीचे मूळ रूपातील दगडी बांधकाम आणि त्यावरी कोरीव कलाकुसर पाहून भाविकांना सुवर्णानुभूती येत आहे.

Vitthal Mandir Conservation | Agrowon

चरणस्पर्श बंद

१५ मार्च पासून संवर्धनाच्या कामासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चरणस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते.

Vitthal Mandir Conservation | Agrowon

मुखदर्शन

चरणस्पर्श बंद असलेल्या कालावधीमध्ये मुखदर्शन मात्र सुरू होते. मात्र आता २ जूननंतर गाभारा आणि मुख्य गाभाऱ्यात भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

Vitthal Mandir Conservation | Agrowon

पुरातन रुपाची अनुभूती

दरम्यान, मंदिर संवर्धनाच्या कामामुळे मंदिराचे पुरातन रूप पाहून भाविकांना त्याकाळातील मंदिराचा अनूभव घेता येत आहे.

Vitthal Mandir Conservation | Agrowon