Anuradha Vipat
दिवाळीच्या स्वागतासाठी आणि घराची शोभा वाढवण्यासाठी हे सर्वोत्तम आणि युनिक रांगोळी डिझाईन्सचे प्रकार या दिवाळीत नक्की ट्राय करा.
आधुनिक फॅशनमध्ये सध्या ३D रांगोळी खूपच लोकप्रिय आहे. रंगांच्या शेडिंगचा आणि गडद-फिकट छटांचा वापर करून ही रांगोळी काढली जाते.
तुम्हाला जर रंगांचा वापर नको असेल, तर रेडीमेड कुंदन रांगोळी हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये एक्रेलिक शीटवर प्लास्टिकचे रंगीबेरंगी कुंदन, मणी आणि खडे चिकटवलेले असतात.
यामध्ये आधी वेगवेगळ्या रंगांचे गोल किंवा चौकोनी पॅचेस तयार केले जातात आणि त्यावर पांढऱ्या रांगोळीने ५ बोटांचा वापर करून अतिशय नाजूक नक्षी काढली जाते.
घराला नैसर्गिक आणि सुगंधी लुक देण्यासाठी फुलांची रांगोळी बेस्ट आहे. झेंडूची पिवळी-नारंगी फुले, गुलाबाच्या पाकळ्या, मोगरा आणि आंब्याची किंवा अशोकाची पाने वापरून ही डिझाईन तयार केली जाते.
भौमितिक आकार आणि एकाग्र वर्तुळांचा वापर करून मांडला रांगोळी काढली जाते. ही डिझाईन दिसायला अतिशय युनिक आणि आधुनिक वाटते.
सध्याच्या ट्रेंडनुसार एखाद्या विशिष्ट थीमवर आधारित रांगोळी काढण्याची क्रेझ आहे. ही रांगोळी तुमच्या सणाचा उत्साह द्विगुणित करेल.