sandeep Shirguppe
पेरू खाणे शरिराला आरोग्यदायी आहे परंतु तुम्हाला पेरूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?
एनसीबीआयच्या मते, पेरूची पाने नैसर्गिक औषध म्हणून काम करतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
पेरूच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबॅक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
पॉलिफेनॉल, कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन ही रसायने आढळतात. या घटकांमुळे आरोग्य चांगले राहते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन नुसार, पेरूच्या पानांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात.
पेरूच्या पानांमध्ये अनेक बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात, जे तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट्स रोखून ठेवण्याचे काम करतात.
पेरूच्या पानांमध्ये हायपोलिपिडेमिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते.
पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटी-हेल्मिंथिक गुणधर्म पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर करतात.
पेरूच्या पानात अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचा शुक्राणूंच्या विषारीपणावर फायदेशीर प्रभाव पडतो. ज्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते.