sandeep Shirguppe
अनेकांना भात खाण्याचे फायदे माहिती पण दूध आणि भात खाल्ल्यास काय फायदे होतात जाणून घेऊ.
दूध भात खाल्ल्याने झोप चांगली येते. दुध भात खालल्याने मेंदू शांत राहतो. त्यामुळे शरीराला आराम मिळतो.
दुधात कॅल्शियम असते. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. त्यामुळे सांधेदुखीसारखे आजार होत नाही.
दूध हे दातांसाठी फायदेशीर असते. दूधामुळे दात मजबूत होतात. दूध भात खालल्याने तुमच्या हिरड्या मजबूत होतात.
दूधात भरपूर फायबर असते. त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते. परिणामी पोटाशीसंबंधित समस्या दूर होतात.
दूध भात खालल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक लागत नाही.
दूधात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
दूध भात खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हाडे मजबूत राहण्यासाठी दूध भात खाणे चांगले असते.