sandeep Shirguppe
पावसाळ्यात बहुतांश जणांना पोटविकाराचे आजार होतात यासाठी डॉक्टर आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
पावसाळ्यात येणारी फरसबी भाजी(बीन्स) आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
फरसबीमध्ये फ्लेवोनोइड्सचे प्रमाण जास्त असते. जे तुमचे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
फरसबीमधील बिया मधुमेहावर रामबाण उपाय आहे. यातील अँटिऑक्सिडंट्स रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
फरसबीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन असल्याने सांध्येदुखी कमी होऊन हाडे मजबूत होतात.
फरसबीमधील कैरोटिनॉइड डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण ठेवण्यास मदत करते. डोळ्यांवरील ताण कमी करून आराम मिळतो.
पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते. अशावेळी नियमित आहारात फरसबीच्या भाजीचा समावेश केल्यास पोटासंबंधित अनेक समस्या दूर होतात.
शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकायचे असल्यास फरसबी शिजवून त्यात मीठ घालून त्यांचे सेवन करावे.
ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.