Anuradha Vipat
लसूण हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध मानला जातो.
काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी लसणाचे अतिसेवन धोकादायक ठरू शकते.
लसणाचा प्रभाव उष्ण आणि तीव्र असतो, त्यामुळे विशिष्ट परिस्थितीत तो शरीराला फायद्याऐवजी नुकसान पोहोचवू शकतो.
लसणामध्ये नैसर्गिकरित्या ॲसिडिक घटक असतात. ज्यांना सतत पित्त, ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास असतो, त्यांनी कच्चा किंवा जास्त प्रमाणात लसूण खाऊ नये.
जर तुमची कोणतीही शस्त्रक्रिया किंवा दातांचे ऑपरेशन होणार असेल, तर त्याच्या किमान २ आठवडे आधी लसूण खाणे बंद करावे. यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.
लसूण नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. म्हणूनच, ज्या लोकांचा ब्लड प्रेशर आधीच कमी असतो किंवा जे लो-बीपीची औषधे घेत आहेत, त्यांनी जास्त लसूण खाऊ नये.
लसणाचे अतिसेवन यकृताच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कच्चा लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने लिव्हरमध्ये टॉक्सिसिटी वाढू शकते.