Sainath Jadhav
सूर्यफूल बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम असतात, जे रोगांपासून संरक्षण करतात. या बिया शरीराची रोगांशी लढायची ताकद वाढवतात.
या बियांमधील फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवते. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांपासून आराम. आतड्यांचे आरोग्य सुधारते.
सूर्यफूल बियांमध्ये प्रोटीन आणि चांगल्या चरबीमुळे ऊर्जा मिळते. यामुळे थकवा कमी होतो आणि पचन क्रिया (चयापचय) सुधारते.
सूर्यफूल बियांमधील मॅग्नेशियम तणाव कमी करतं आणि मन शांत ठेवतं. त्यामुळे चिंता कमी होते आणि झोप चांगली लागते.
सूर्यफूल बियांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांना बळकटी देतात. हाडांचे आरोग्य सुधारते.ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.
सूर्यफूल बियांतील चांगली चरबी आणि फायबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात आणि मधुमेहाचा धोका कमी करतात.
सूर्यफूल बिया खाण्यासाठी सोपे उपाय – त्या सलाड, स्मूदी, दही किंवा ओटमीलमध्ये मिसळा, किंवा भाजून चविष्ट स्नॅक म्हणून खा.
सूर्यफूल बिया खाताना थोडक्यात लक्षात ठेवा — जास्त खाऊ नका, नीट चावून खा आणि ऍलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.