Anuradha Vipat
दिवाळी हा सण सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो.
या पवित्र काळात घरात काही छोटे पण महत्त्वाचे वास्तू बदल केल्यास माता लक्ष्मी कायमची घरात वास करते, अशी धार्मिक मान्यता आहे.
या दिवाळीत मुख्य दाराच्या आतल्या बाजूला धनकुबेराची किंवा हसऱ्या बुद्धाची मूर्ती अशा प्रकारे ठेवा, जेणेकरून घरात येणाऱ्या प्रत्येकाला ती दिसेल.
वास्तू शास्त्रानुसार, उत्तर दिशा ही धनाचा देवता कुबेराची मानली जाते. पैशांची तिजोरी किंवा कपाट उत्तर किंवा पूर्व दिशेकडे होईल अशा पद्धतीने ते ठेवा.
घराचा ईशान्य कोपऱ्यात एक लहान पाण्याचे कारंजे किंवा पसरट पात्रात पाणी भरून त्यात ताजी फुले ठेवा.
यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवघरात सिद्ध महालक्ष्मी यंत्र, ५ गोमती चक्र आणि ३ पिवळ्या कवड्या लाल कपड्यावर ठेवा.
या दिवाळीत आग्नेय कोपऱ्यात एक छोटा लाल रंगाचा बल्ब किंवा दिवा लावा, जो २४ तास चालू राहील. यामुळे घरातील आर्थिक अडथळे दूर होतात.