Anuradha Vipat
शरीरात वाढलेले वाईट कोलेस्टेरॉल धमन्यांमध्ये जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
औषधांशिवाय केवळ योग्य आहाराच्या मदतीने कोलेस्टेरॉल नैसर्गिकरित्या कमी करता येते.
सकाळी नाश्त्याला साखरेऐवजी भाज्या टाकून बनवलेले ओट्स किंवा जवची पेज खाणे सर्वात उत्तम ठरते.
सुकामेव्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. हे घटक धमन्यांमधील सूज कमी करतात आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवून वाईट कोलेस्टेरॉल कमी करतात.
लसूण नियमित खाल्ल्याने यकृतामध्ये कोलेस्टेरॉल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो.
मेथी दाणे आणि अळशीच्या बियांमध्ये विद्राव्य फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते.
सफरचंद, संत्री, लिंबू आणि द्राक्षे यामध्ये 'पेक्टिन' नावाचे नैसर्गिक फायबर असते, जे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ओळखले जाते.