Anuradha Vipat
लघवी करताना जळजळ होणे ही एक अत्यंत त्रासदायक समस्या आहे, जी प्रामुख्याने लघवीच्या मार्गातील संसर्ग, शरीरातील पाण्याची कमतरता किंवा अतिउष्णतेमुळे होते.
यामुळे लघवी करताना तीव्र वेदना, आग होणे आणि वारंवार लघवीला जावे लागणे असा त्रास होतो.
भरपूर पाणी प्यायल्याने लघवी पातळ होते आणि संसर्ग निर्माण करणारे बॅक्टेरिया शरीराबाहेर वाहून जातात.
धने हे निसर्गाने थंड प्रवृत्तीचे असतात. आयुर्वेदात लघवीची उष्णता आणि जळजळ कमी करण्यासाठी धने अत्यंत गुणकारी मानले जातात.
नारळ पाणी किंवा शहाळ्याचे पाणी हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राखते आणि लघवीच्या मार्गातील जळजळ कमी करते.
लिंबामध्ये असणारे व्हिटॅमिन सी मूत्राशयातील बॅक्टेरियाचा नाश करण्यास मदत करते आणि लघवीची आम्लता कमी करते.
जिरे शरीरातील पित्त आणि अंतर्गत उष्णता शांत करण्याचे काम करतात.