Anuradha Vipat
जुलाब म्हणजेच अतिसार हा प्रामुख्याने अपचन, दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन, आणि पोटातील इन्फेक्शनमुळे होणारा आजार आहे.
जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि अत्यंत आवश्यक खनिजे झपाट्याने कमी होतात, ज्यामुळे शरीरात तीव्र अशक्तपणा येतो.
जुलाब सुरू झाल्यावर सर्वात आधी शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणे आवश्यक असते.
दही हे एक उत्तम 'प्रोबायोटिक' आहे. यामध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया पोटातील जंतूंशी लढतात आणि पचनक्रिया पूर्ववत करतात.
पिकलेले किंवा कच्चे केळे जुलाब थांबवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. केळ्यामध्ये 'पेक्टिन' नावाचा फायबर घटक असतो, जो विष्ठा घट्ट करण्यास मदत करतो.
आयुर्वेदात जायफळ हे पोटाचे विकार आणि जुलाब रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी औषध मानले गेले आहे.
सुंठ (वाळलेले आले) पोटातील गॅस, कळा आणि जुलाबाचे इन्फेक्शन कमी करते.