Anuradha Vipat
एक मजबूत आणि मस्कुलर बॉडी बनवणे ही केवळ जिममध्ये जाऊन वजन उचलण्यापुरती मर्यादित गोष्ट नाही.
मस्कुलर बॉडीसाठी योग्य व्यायाम, पौष्टिक आहार आणि पुरेशी विश्रांती यांचा योग्य ताळमेळ असणे गरजेचे आहे.
स्नायूंची वाढ आणि त्यांची झीज भरून काढण्यासाठी प्रथिने हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा तुम्ही वजन उचलून कसरत करता, तेव्हा स्नायूंचे फायबर्स तुटतात आणि प्रोटीन त्यांना मजबूत बनवून पुन्हा तयार करते
जिममध्ये दररोज एकाच वजनाने व्यायाम केल्यास स्नायूंची वाढ खुंटते. स्नायूंचा आकार वाढवण्यासाठी तुम्हाला 'प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड' चा वापर करावा लागेल, म्हणजेच हळूहळू व्यायामाचे वजन किंवा रेप्स वाढवावे लागतील.
अनेक जणांचा असा गैरसमज असतो की जिममध्ये जास्त वेळ घालवल्याने बॉडी बनते. परंतु, स्नायूंची वाढ तुम्ही जिममध्ये वर्कआउट करत असताना नाही, तर जेव्हा तुम्ही विश्रांती घेत असता तेव्हा होते.
आपले स्नायू हे जवळपास ७०% ते ७5% पाण्याने बनलेले असतात. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास स्नायूंचा आकार लहान दिसू लागतो आणि वर्कआउट करताना लवकर थकवा येतो.
मस्कुलर बॉडी एका रात्रीत किंवा एका महिन्यात बनत नाही. यासाठी महिने किंवा वर्षांचे सातत्य लागते. आठवड्यातून किमान ४ ते ५ दिवस न चुकता वर्कआउट करा.