Sinus Relief : सायनसचा त्रास मुळापासून होईल कमी; आजच ट्राय करा हे आरामदायी नैसर्गिक उपाय

Anuradha Vipat

त्रासदायक समस्या

सायनस ही एक अत्यंत त्रासदायक समस्या आहे, ज्यामध्ये नाकाभोवतीच्या पोकळ्यांमध्ये सूज येते.

Sinus Relief | agrowon

समस्या

यामुळे नाक बंद होणे, तीव्र डोकेदुखी, चेहऱ्यावर सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवतात.

Sinus Relief | agrowon

वाफ घेणे

सायनसवर वाफ घेणे हा सर्वात सोपा आणि रामबाण उपाय आहे. गरम पाण्यात पुदिन्याचे तेल किंवा नीलगिरीचे तेल २-३ थेंब टाकून दिवसातून २ ते ३ वेळा वाफ घ्यावी.

Sinus Relief | Agrowon

कोमट पाण्याचा शेक देणे

नाक आणि डोळ्यांच्या आजूबाजूला सायनसच्या भागावर तीव्र वेदना होत असल्यास कोमट पाण्याचा शेक द्यावा.

Sinus Relief | Agrowon

भरपूर पाणी आणि द्रव पदार्थांचे सेवन

शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखणे सायनसच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाचे आहे. दिवसभरात भरपूर कोमट पाणी, लिंबू पाणी, किंवा आल्याचा चहा प्यावा.

Sinus Relief | Agrowon

आल्याचा आणि तुळशीचा काढा

आले आणि तुळशीमध्ये नैसर्गिक सूज कमी करणारे आणि जंतूनाशक गुणधर्म असतात. यामुळे घशातील खवखव आणि सायनसची सूज कमी होते.

Sinus Relief | Agrowon

जलनेती किंवा सलाईन नेझल स्प्रे

कोमट पाण्यात थोडेसे मीठ मिसळून तयार केलेल्या पाण्याने नाक स्वच्छ करणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने सलाईन नेझल ड्रॉप्स वापरणे फायदेशीर ठरते.

Sinus Relief | Agrowon

Horoscope 27 September 2026 : आजचा दिवस प्रगतीचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल

Horoscope 27 September 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...