Running Tips : धावताना श्वास फुलतो? वापरा या सोप्या ट्रिक्स आणि वाढवा तुमची रनिंग

Anuradha Vipat

सामान्य समस्या

धावताना दम लागणे किंवा श्वास फुलणे ही अतिशय सामान्य समस्या आहे.

Running Tips | Agrowon

त्रास

नवशिक्यांमध्ये किंवा चुकीच्या पद्धतीने धावल्यामुळे हा त्रास जास्त जाणवतो.

Running Tips | Agrowon

सोपे आणि प्रभावी उपाय

धावताना स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि दम न लागण्यासाठी पुढील सोपे आणि प्रभावी उपाय नक्की करून पहा.

Running Tips | Agrowon

श्वास घेण्याची योग्य पद्धत

धावताना २:२ चा पॅटर्न वापरा. म्हणजेच दोन पावले टाकेपर्यंत श्वास आत घ्या आणि पुढील दोन पावले टाकेपर्यंत श्वास बाहेर सोडा.

Running Tips | Agrowon

सुरुवातीला वेग कमी ठेवा

सुरुवातीची ५ ते १० मिनिटे अतिशय संथ गतीने धावा. शरीर पूर्णपणे वॉर्म-अप झाल्यावर हळूहळू वेग वाढवा.

Running Tips | Agrowon

'Run-Walk' पद्धतीचा वापर

३ मिनिटे धावा आणि नंतर १ मिनिट गतीने चाला . ही प्रक्रिया ३ ते ४ वेळा करा. यामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता हळूहळू वाढते.

Running Tips | Agrowon

शरीराची पोझिशन योग्य ठेवा

धावताना डोके सरळ ठेवा, खांदे सैल ठेवा आणि पुढे जास्त झुकू नका. सरळ पोश्चर ठेवल्याने फुफ्फुसांना पूर्ण क्षमतेने फुगण्यास जागा मिळते.

Running Tips | Agrowon

Taro Leaves Benefits : अळूच्या वड्या तर नेहमीच खाता, पण या पानांचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

Taro Leaves Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...