Anuradha Vipat
मासिक पाळी अनियमित असणे ही सध्या महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे.
खराब जीवनशैली, मानसिक ताण, हॉर्मोन्सचे असंतुलन , किंवा रक्ताची कमतरता यांमुळे हा त्रास होऊ शकतो.
आलं गर्भाशयाच्या स्नायूंना संकुचित करण्यास मदत करते, ज्यामुळे मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होते.
कच्च्या पपईमध्ये 'कॅरोटीन' असते, जे शरीरातील 'इस्ट्रोजेन' हॉर्मोनला उत्तेजित करते आणि पाळीचे चक्र नियमित करते.
दालचिनी शरीराला थंडावा देते, इन्सुलिनची पातळी नियंत्रित करते आणि हॉर्मोनल संतुलन सुधारण्यास मदत करते.
बडीशेपमध्ये असणारे गुणधर्म महिलांमधील मासिक पाळीचे नियमन करण्यास आणि पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करतात.
तीळ आणि गूळ या दोन्हीची प्रकृती उष्ण असते. हे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून रखडलेली पाळी वेळेवर आणण्यास मदत करतात.