Bone Health : हाडे होतील वज्रासारखी मजबूत! रोज सकाळी करा 'या' सोप्या गोष्टी

Anuradha Vipat

सांधेदुखीचा त्रास

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे आजकाल कमी वयातच हाडे कमकुवत होणे आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.

Bone Health | Agrowon

हाडांचे आजार

हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील हाडांचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी कोणत्या सोप्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत, हे आपण या लेखात पाहणार आहोत.

Bone Health | Agrowon

कोवळ्या उन्हात १० ते १५ मिनिटे बसा

हाडांच्या मजबुतीसाठी केवळ कॅल्शियम पुरसे नसते, तर ते कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी ची अत्यंत आवश्यकता असते. रोज सकाळी सूर्योदयानंतरच्या कोवळ्या उन्हात किमान १० ते १५ मिनिटे बसा किंवा चाला.

Bone Health | Agrowon

भिजवलेला सुका मेवा खा

सकाळी रिकाम्या पोटी उठल्यानंतर चहा-कॉफी घेण्याऐवजी हाडांना पोषण देणारे पदार्थ खावेत. आदल्या रात्री भिजवून ठेवलेले ४ ते ५ बदाम आणि २ अक्रोड रोज सकाळी खा.

Bone Health | Agrowon

कॅल्शियमयुक्त नाश्ता करा

नाश्त्यामध्ये एक ग्लास कोमट दूध, दही, पनीर किंवा नाचणीची भाकरी/दशमी यांचा समावेश करा. नाचणी हे कॅल्शियमचा सर्वात मोठा वनस्पतीजन्य स्त्रोत आहे.

Bone Health | agrowon

वेट-बेअरिंग व्यायाम करा

हाडे सक्रिय ठेवल्याशिवाय ती मजबूत होऊ शकत नाहीत. सकाळी शरीराची हालचाल करणे हाडांच्या पेशींना मजबूत करते. रोज सकाळी २० ते ३० मिनिटे वेगाने चाला.

Bone Health | Agrowon

योग आणि स्ट्रेचिंग

हाडांची लवचिकता वाढवण्यासाठी आणि सांध्यांमधील कडकपणा दूर करण्यासाठी सकाळी स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे.

Bone Health | Agrowon

Pre Pregnancy Tips : आई होण्याचा विचार करताय? सुरक्षित आणि नैसर्गिक गर्भधारणेसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्री-प्रॅग्नन्सी टिप्स

Pre Pregnancy Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...