Anuradha Vipat
गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यातील एक अत्यंत सुंदर आणि आनंदाचा क्षण असतो.
आजकालची बदलती जीवनशैली, मानसिक तणाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे गर्भधारणेमध्ये अनेक अडचणी येतात.
एक सुरक्षित, निरोगी आणि नैसर्गिक गर्भधारणा होण्यासाठी गर्भ राहण्यापूर्वीच शरीराची आणि मनाची पूर्वतयारी करणे आवश्यक असते.
डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताची तपासणी, हिमोग्लोबिन , थायरॉईड, मधुमेह आणि रुबेला इम्युनिटी यांसारख्या आवश्यक चाचण्या करून घ्या.
बाळाच्या मेंदूच्या आणि मणक्याच्या निरोगी विकासासाठी फॉलिक ॲसिड हे जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे असते.
ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, सुका मेवा आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढवा. यामुळे शरीराला आवश्यक लोह आणि कॅल्शियम मिळते.
मानसिक तणावाचा थेट परिणाम स्त्रीच्या संप्रेरकांवर होतो, ज्यामुळे नैसर्गिक गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होतात.