Tonsillitis Remedies : टॉन्सिल्सवर रामबाण घरगुती तोडगे: अन्न गिळताना होणारा त्रास मिनिटांत होईल दूर!

Anuradha Vipat

संसर्गापासून रक्षण

टॉन्सिल्स हा आपल्या गळ्याच्या दोन्ही बाजूला असणारा ग्रंथींचा एक भाग आहे, जो शरीराचे संसर्गापासून रक्षण करतो.

Tonsillitis Remedies | Agrowon

टॉन्सिलायटिस

जेव्हा या ग्रंथींमध्ये जिवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे सूज येते, तेव्हा त्याला टॉन्सिलायटिस असे म्हणतात.

Tonsillitis Remedies | Agrowon

त्रास

यामुळे घसा दुखणे, लाळ किंवा अन्न गिळताना तीव्र वेदना होणे आणि काही वेळा ताप येणे असा त्रास होतो.

Tonsillitis Remedies | Agrowon

कोमट पाणी आणि मिठाच्या गुळण्या

हा टॉन्सिल्सवरचा सर्वात जुना, सोपा आणि खात्रीशीर उपाय आहे. मीठ हे नैसर्गिक जंतूनाशक म्हणून काम करते, ज्यामुळे घशातील सूज आणि बॅक्टेरिया कमी होतात.

Tonsillitis Remedies | Agrowon

हळद आणि काळ्या मिरीचे दूध

हळदीमध्ये 'कर्क्युमिन' हा घटक असतो, जो सूज आणि जंतूंचा नाश करतो. काळी मिरी घशातील संसर्ग साफ करण्यास मदत करते.

Tonsillitis Remedies | Agrowon

मध आणि लिंबाचा रस

मध घशाला मऊपणा देतो आणि जळजळ कमी करतो. लिंबामध्ये असणारे व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि संसर्गाशी लढण्यास मदत करते.

Tonsillitis Remedies | Agrowon

आल्याचा चहा

आल्यामध्ये शक्तिशाली अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे घशातील वेदना देणाऱ्या जंतूंचा पाडाव करतात.

Tonsillitis Remedies | Agrowon

Chest Congestion : खोकला आणि छातीतील जडपणावर रामबाण उपाय: कफ बाहेर काढण्याचे नैसर्गिक मार्ग

Chest Congestion | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...