Anuradha Vipat
दुपारच्या जेवणानंतर ताक पिणे आरोग्यासाठी अमृत मानले जाते.
आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत सर्वच ठिकाणी दुपारच्या जेवणानंतर ताक पिण्याचा सल्ला दिला जातो.
ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे आपण खाल्लेले अन्न वेगाने पचवण्यास मदत करते. जेवणानंतर ताक प्यायल्याने पोट जड होत नाही आणि पचनसंस्था सुरळीत चालते.
ताक हे एक उत्कृष्ट प्रोबायोटिक आहे. यामध्ये शरीराला फायदेशीर असणारे बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवतात
ताकाचा स्वभाव थंड असतो. दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायल्याने शरीराला झटपट थंडावा मिळतो. तसेच, ताकामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते.
जेवणानंतर ताक प्यायल्याने तृप्ती मिळते ज्यामुळे दुपारनंतर अवेळी लागणारी भूक किंवा गोड खाण्याची इच्छा नियंत्रित राहते.
ताकातून शरीराला कॅल्शियम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम आणि प्रोटीन सहज मिळतात. यामुळे हाडे मजबूत होतात आणि दिवसभराचा थकवा दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळते.