sandeep Shirguppe
चंदनामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक सारखे गुणधर्म आहेत. याची पेस्ट नियमीत लावल्यास चेहऱ्याचा ग्लो वाढतो.
चंदन आणि संत्र्याच्या सालापासून बनलेल्या पावडरचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावर नॅचरलपणा वाढतो.
चंदनात पाणी किंवा गुलाब जल मिक्स केल्यास गर्मीमध्ये चेहऱ्याला आराम मिळतो.
चंदन पावडरमध्ये दूध आणि हळद मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि धब्बे दूर होतात.
चंदनात दही किंवा गुलाब जल लावल्याने तुम्ही त्वचा तरुण ठेवू शकता.
चंदन पावडर हळद आणि गुलाब जल मिक्स करून ते पिंपल्सवर लावा.
उन्हाळ्यात टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा चंदनाची पेस्ट लावावी.