sandeep Shirguppe
रताळ्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते, रताळ उकडून किंवा भाजून खाल्ल्यास अनेक फायदे होतात.
लोह, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस यासारखे घटक रताळात असतात.
नियमितपणे रताळे खाल्ले तर सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर विषाणूजन्य आजारांचा धोका कमी होतो.
रताळ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते ज्यामुळे आतड्यांच्या हालचालींचे नियमन करणे सोपे होते.
रताळ्यासारखे आरोग्यदायी पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्याने रक्तदाब वाढत नाही नाही, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
रताळ्याची चव गोड असली तरी हा कमी उष्मांक आणि उच्च फायबरयुक्त आहार आहे.
रताळ नियमीत खाल्ल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते, जे तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते.