Dark Neck And Elbows Remedies : काळी पडलेली मान आणि कोपर उजळवण्यासाठी आजीच्या बटव्यातील सोपे तोडगे

Anuradha Vipat

सामान्य समस्या

त्वचेची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे, घर्षणामुळे किंवा मृत पेशी साचल्यामुळे मान आणि कोपर काळे पडणे ही एक सामान्य समस्या आहे.

Dark Neck And Elbows Remedies | Agrowon

घरगुती उपाय

रासायनिक उत्पादनांऐवजी घरगुती उपायांचा नियमित वापर करून हा काळेपणा पूर्णपणे दूर केला जाऊ शकतो.

Dark Neck And Elbows Remedies | agrowon

लिंबू आणि मध

लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंगचे गुणधर्म आणि व्हिटॅमिन-सी भरपूर असते, जे काळेपणा हलका करण्यास मदत करते. मध त्वचेला मऊ आणि मॉइश्चराईज ठेवते.

Dark Neck And Elbows Remedies | Agrowon

बटाट्याचा रस

बटाट्यामध्ये 'कॅटेकोलेज' नावाचे एन्झाईम असते, जे काळे डाग आणि त्वचेचा काळेपणा नैसर्गिकरित्या दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.

Dark Neck And Elbows Remedies | agrowon

बेसन, हळद आणि दही

बेसन मृत त्वचा काढून टाकण्याचे काम करते. दह्यातील लॅक्टिक ॲसिड काळेपणा दूर करते आणि हळद त्वचेचा रंग उजळवते.

Dark Neck And Elbows Remedies | agrowon

खोबरेल तेल आणि लिंबाचा रस

खोबरेल तेल त्वचेला खोलवर हायड्रेट करते आणि खराब झालेली त्वचा दुरुस्त करते, तर लिंबू काळेपणा साफ करतो.

Dark Neck And Elbows Remedies | agrowon

कोरफड आणि बेकिंग सोडा

बेकिंग सोडा त्वचेवरील साचलेली घाण आणि मृत पेशी लगेच साफ करतो, तर कोरफड त्वचेचा जळजळपणा कमी करून तिला मऊ बनवते.

Dark Neck And Elbows Remedies | agrowon

Puffy Face Remedies : सकाळी उठल्यावर चेहरा आणि डोळे सुजलेले दिसतात? 'हे' घरगुती उपाय देतील झटपट फ्रेश लूक!

Puffy Face Remedies | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...