Anuradha Vipat
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात.
ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, या अत्यंत शुभ दिवशी काही सोपे उपाय केल्यास घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदते आणि पैशांची चणचण भासत नाही.
जन्माष्टमीच्या मध्यरात्री बाळकृष्णाच्या जन्मोत्सवानंतर त्याला लोणी आणि खडीसाखरेचा भोग चढवा. यामुळे घरातील पैशांची टंचाई दूर होते आणि व्यवसायात बरकत येते.
जन्माष्टमीच्या मध्यरात्री पूजेच्या वेळी बाळकृष्णाला एक छोटी चांदीची बासरी अर्पण करा. पूजा संपन्न झाल्यानंतर ती बासरी तुमच्या कपाटात किंवा पैशांच्या तिजोरीत ठेवा.
जन्माष्टमीच्या दिवशी बाजारातून ३ नवीन मोरपिसे विकत आणून ती बाळकृष्णाच्या मुकुटाजवळ किंवा पूजेत ठेवावीत. घरातील वास्तू दोष दूर होतात, कौटुंबिक वाद मिटतात.
जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी कोणत्याही कृष्ण मंदिरात जाऊन २७ बदाम आणि १ पाणी असलेला नारळ अर्पण करा.