Walking Mistakes : रोज चालताय? पण चालताना होणाऱ्या 'या' गंभीर चुका आरोग्याला पडतील महाग!

Anuradha Vipat

वाईट परिणाम

चालणे हा आरोग्यासाठी उत्तम आणि सोपा व्यायाम आहे. परंतु, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चालत असाल, तर त्याचा तुमच्या गुडघ्यांवर, पाठीवर आणि घोट्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Walking Mistakes | Agrowon

चुकीची पादत्राणे

फ्लॅट किंवा कडक सोल असलेल्या चपलांमुळे पायांच्या तळव्यांना आणि टाचांना पुरेसा सपोर्ट मिळत नाही. यामुळे टाच दुखी आणि नसांवर ताण येण्याचा धोका वाढतो.

Walking Mistakes | agrowon

मान खाली घालून किंवा वाकून चालणे

मोबाईल बघत चालणे किंवा सतत जमिनीकडे पाहत चालणे ही आजकाल अनेकांची सवय झाली आहे. असे केल्याने तुमच्या मानेच्या आणि पाठीच्या मणक्यावर अतिरिक्त ताण पडतो.

Walking Mistakes | Agrowon

पावले जमिनीवर जोरात आपटणे

पावले जमिनीवर आदळल्यामुळे निर्माण होणारा झटका थेट तुमच्या घोट्यांवर, गुडघ्यांवर आणि कंबरेवर बसतो. यामुळे कमी वयातच गुडघेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो.

Walking Mistakes | agrowon

क्षमतेपेक्षा जास्त मोठे पाऊल टाकणे

शरीराच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा मोठे पाऊल टाकल्याने पायांच्या स्नायूंवर ताण येतो आणि शरीराचा तोल बिघडून सांधे दुखी किंवा नसा ताणल्या जाण्याचा धोका वाढतो.

Walking Mistakes | Agrowon

हातांची हालचाल न करणे

हातांची योग्य हालचाल न केल्यास शरीराची गती कमी होते आणि चालताना शरीराचा बॅलन्स राखण्यासाठी पाठीला जास्त मेहनत करावी लागते.

Walking Mistakes | Agrowon

मोबाईल बघत चालणे

यामुळे मानेवर अतिरिक्त ताण येतो आणि पाठीचा कणा बिघडतो. नेहमी समोर पहात सरळ चाला.

Walking Mistakes | Agrowon

Fenugreek For Joint Pain : सांधेदुखीवर रामबाण उपाय आहे मेथीची भाजी! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

Fenugreek For Joint Pain : | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...