Sunflower Seeds Benefits : व्हिटॅमिन ई चा खजिना: सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Anuradha Vipat

नैसर्गिक स्त्रोत

सूर्यफुलाच्या बिया हा व्हिटॅमिन ई चा सर्वात उत्कृष्ट आणि समृद्ध नैसर्गिक स्त्रोत मानला जातो.

Sunflower Seeds Benefits | Agrowon

आरोग्य सुधारण्यास मदत

व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरातील पेशींचे रक्षण करते आणि त्वचा, केस व हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

Sunflower Seeds Benefits | Agrowon

चमकदार त्वचा आणि अँटी-एजिंग

सूर्यफुलाच्या बियांमधील मुबलक व्हिटॅमिन ई हे त्वचेसाठी संरक्षण कवच म्हणून काम करते. हे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करते.

Sunflower Seeds Benefits | agrowon

तीव्र केस गळती

केसांच्या मुळांना रक्ताभिसरण योग्य न मिळाल्यास केस कोरडे होऊन गळू लागतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई सोबतच 'लोह' आणि 'झिंक' चे प्रमाण चांगले असते.

Sunflower Seeds Benefits | Agrowon

हृदयाचे आरोग्य

या बियांमध्ये निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. तसेच यामध्ये आढळणारे 'फायटोस्टेरॉल्स' शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण झपाट्याने कमी करतात.

Sunflower Seeds Benefits | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

सूर्यफुलाच्या बियांमध्ये 'सेलेनियम' आणि झिंक हे दोन अत्यंत महत्त्वाचे खनिज घटक असतात. सेलेनियम शरीरातील अंतर्गत सूज आणि संसर्ग कमी करतो.

Sunflower Seeds Benefits | Agrowon

वजन

यामध्ये भरपूर प्रमाणात वनस्पती-आधारित प्रोटीन आणि डाएटरी फायबर असतात. संध्याकाळच्या वेळी १ चमचा या बिया खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे जंक फूड खाण्याची इच्छा होत नाही.

Sunflower Seeds Benefits | Agrowon

Instant Acidity Relief : १ मिनिटात आराम! पित्ताचा त्रास झटपट थांबवणारे ५ सोपे घरगुती उपाय

Instant Acidity Relief | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...