Anuradha Vipat
जवस हे पुरुषांच्या आरोग्यासाठी एक उत्कृष्ट सुपरफूड मानले जाते.
जवसमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण मुबलक असते, जे पुरुषांच्या अनेक विशिष्ट आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करतात.
जवसामध्ये 'लिग्नॅन्स' नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक पुरुषांच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवतात आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून रोखतात.
जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि झिंक असते. हे घटक पुरुषांमधील मुख्य सेक्स हार्मोन म्हणजेच टेस्टोस्टेरॉनची पातळी नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत करतात.
जवसातील ओमेगा-३ हे धमन्यांमध्ये जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल वितळवण्याचे काम करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदयाचे रक्षण करते.
जवस नियमित खाल्ल्याने शरीरातील DHT हार्मोन नियंत्रित राहतो, ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात, केस गळणे थांबते.
जवस खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. व्यायाम करणाऱ्या पुरुषांसाठी हे स्नायूंच्या वाढीसाठी आणि रिकव्हरीसाठी उत्तम ठरते.