Anuradha Vipat
बदलत्या हवामानामुळे किंवा संसर्गामुळे छातीत कफ जमा झाल्यास श्वास घेण्यास त्रास होतो आणि सतत खोकला येतो.
छातीत साठलेला हा कफ पातळ करून तो शरीराबाहेर काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित उपाय सांगितले आहेत.
आल्यामध्ये सूज कमी करणारे गुणधर्म असतात. मिरेपूड कफ वितळवण्याचे काम करते आणि मध गळ्यातील खवखव शांत करतो.
ज्येष्ठमध ही कफावरील सर्वोत्तम आयुर्वेदिक औषधी मानली जाते. हे श्वसननलिकेतील सूज कमी करते आणि कफ सैल करून बाहेर काढते.
तुळस फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवते, तर लवंग आणि दालचिनी शरीरात उष्णता निर्माण करून कफ सुका किंवा घट्ट होण्यापासून रोखतात.
वाफ घेतल्याने श्वसनमार्ग लगेच मोकळा होतो. ओवा आणि कापूर हवेतील जंतू नष्ट करतात आणि फुफ्फुसातील घट्ट कफ पातळ करतात.
गळ्यात आणि श्वास नलिकेच्या वरच्या भागात साठलेला कफ साफ करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि जुना उपाय आहे.