Anuradha Vipat
सायकल चालवणे हा केवळ एक आनंददायी छंद नाही, तर तो संपूर्ण शरीराचा उत्तम व्यायाम आहे.
आठवड्यातून काही तास सायकल चालवल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये कमालीची सुधारणा होते.
सायकल चालवल्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.
सायकलिंग हा एक उत्तम कॅलरी बर्निंग व्यायाम आहे. नियमित तासभर मध्यम गतीने सायकल चालवल्याने सुमारे ४०० ते ६०० कॅलरीज बर्न होतात.
सायकल चालवताना पायांचे स्नायू, मांड्या, आणि मांड्यांचे मागचे स्नायू यांचा मोठा सराव होतो.
धावणे किंवा इतर व्यायामांच्या तुलनेत सायकलिंगमुळे गुडघे आणि सांध्यांवर जास्त ताण पडत नाही.
मोकळ्या हवेत सायकल चालवल्याने शरीरात 'एन्डॉर्फिन' सारखे 'हॅपी हार्मोन्स' तयार होतात. यामुळे दिवसभराचा मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होऊन रात्री उत्तम झोप येते.