sandeep Shirguppe
आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने पास्ता खातात.
पास्ता हा जंक फूड म्हणून ओळखला जातो. पण तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवलेला पास्ता खाऊ शकता.
गव्हापासून बनवलेल्या पास्तामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते.
गव्हाच्या पास्तामध्ये व्हिटॅमिन बी, लोह, मॅग्नेशिअम आणि झिंक यासारखे पोषक घटक असतात.
पास्ता खाल्ल्याने तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्ही कमी खातात, ज्यामुळे वजन कमी होते.
गव्हापासून बनवलेल्या पास्तामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.
गव्हाच्या पास्तामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. प्रथिने स्नायू मजबूत होण्यास मदत करतात.
गव्हाच्या पास्तामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.