sandeep Shirguppe
मनुक्याचे आपल्या शरिराला अनेक फायदे आहेत. मनुके भिजवून खाल्ल्याने काय फायदे मिळतात याबाबत माहिती घेऊ.
बेदाण्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात.
मनुकामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
स्रियांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमियाची समस्या होते. त्यांनी भिजवलेले मनुके खाणे फायदेशीर ठरते.
मनुक्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
ज्यांना बद्धकोष्ठता आणि गॅस-अॅसिडिटीचा त्रास होतो त्यांनी रोज सकाळी भिजवलेले मनुके खावेत.
तुमच्या यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठीदेखील हे भिजवलेले बेदाणे उपयुक्त ठरतात.
भिजवलेल्या बेदाण्याबरोबरच त्याचे पाणी पिल्याने आपल्या शरिरातील विषारी घटक दूर होण्यास मदत होते.