sandeep Shirguppe
सीताफळ आरोग्यदायी गुणांचा खजिना आहे. गर्भवती महिलांसाठी सीताफळ अतिशय फायदेशीर मानले जाते.
सीताफळमध्ये अतिशय पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळते म्हणून हे आरोग्यासाठी फायदेशिर मानले जाते.
सीताफळात असलेल्या मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
सीताफळमध्ये व्हिटॅमिन सी, बी 6 मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.
टाईप -2 मधुमेहाचा धोका कमी करू शकतो आणि उच्च आणि निम्न बीपीमध्ये आराम देखील प्रदान करू शकतो.
जर तुम्हाला दात किंवा हिरड्यांना त्रास होत असेल तर सीताफळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.
सीताफळचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते.
गरोदरपणात दररोज सीताफळ घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका कमी होतो.