sandeep Shirguppe
नाचणी आंबिल ही एक पारंपारिक महाराष्ट्रीय रेसिपी आहे. ही पाककृती चवदार आणि आरोग्यदायी आहे.
शरिराला थंड ठेवण्यासाठी आंबिल घेण्याचा सल्ला दिला जातो. नियमित पिल्यास अनेक समस्या नियंत्रणात राहू शकतात.
आंबिल हे ग्लूटेन मुक्त आणि आयर्नचा उत्तम स्रोत आहे. याचे शरिराला अनेक फायदे होतात.
फायबरचे उच्चप्रमाण असल्याने गरजेपेक्षा जास्त खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.
आंबिल पिल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
लहान मुलांसाठी निरोगी अन्न म्हणून आंबिल दिले जाते. पोष्टिक अन्न म्हणून आंबिलची ओळख आहे.
नाचणीमध्ये ‘व्हिटॅमिन बी ३’ असते, जे त्वचेच्या निरोगी निर्मितीस मदत करते आणि सुरकुत्या आणि त्वचा रोग टाळते.
नाचणी पिठात शरीरात न विरघळणारे फायबर असते, ज्यामुळे पचन सुलभ होते आणि बद्धकोष्ठता दूर राहते.