Team Agrowon
राज्यात सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ च्या दरम्यान पशुगणनेला सुरुवात होत आहे. पशुगणना ही देश किंवा प्रदेशातील पशुधन आणि कुक्कुटपालन यांची संपूर्ण गणना असते. १९१९-२० पासून देशात तसेच आपल्या राज्यात पशुगणना सुरू झाली.
पशुगणना नियमित अंतराने दर पाच वर्षांनी केली जाते. हा उपलब्ध डाटा पशुसंवर्धन विभागात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि विकासाचा मागोवा घेण्यासाठी वापरला जातो.
परंतु कोविडमुळे दोन वर्षे पशुगणना पुढे ढकलली गेल्यामुळे आता सप्टेंबर २०२४ मध्ये २१ वी पशुगणना सुरू होत आहे.
पशुगणनेमुळे अनेक पशू रोगांचे नियंत्रण करणे सोपे होते. पशुधनाचे उत्पादन कळल्यामुळे त्याबाबतीत निश्चित धोरण देखील आखता येते. पशुंची आयात निर्यात ठरवता येते.
पशुगणनेतून राज्यातील निश्चित पशुधनाची व कुक्कुटपालनांची आकडेवारी समोर येणार आहे. सोबत त्यांच्या प्रजाती व जातींची माहिती उपलब्ध होणार आहे.
पशुगणनेमुळे भूमिहीन, शेतमजूर यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना देखील आखण्यास मदत होते.
पशुंची समोर येणारी आकडेवारी पशुसंवर्धन विभागासह देशातील अनेक मंत्री कार्यालयांना आपापल्या योजना सादर करण्यासाठी उपयोगी पडते.