Anuradha Vipat
हिंदू धर्मात १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला अत्यंत महत्त्वाचे आणि मोक्षदायी मानले जाते.
धार्मिक ग्रंथांनुसार जो व्यक्ती मनोभावे १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतो त्याच्या सात जन्मांची पापे नष्ट होतात.
अशी मान्यता आहे की ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात एकदा तरी बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण केली आहे त्याला मृत्यू पश्चात मोक्ष प्राप्त होतो.
बारा ज्योतिर्लिंगाला गेल्याने मनाला अपार शांती मिळते आणि मानसिक तणाव दूर होतो .
त्र्यंबकेश्वर किंवा महाकालेश्वर येथे दर्शन घेतल्याने शनीच्या साडेसातीचा त्रास कमी होतो.
अनेक ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी कालसर्प शांती पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात.
श्रद्धेने केलेल्या दर्शनामुळे व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते.