Ambabai Rathotsav : करवीर निवासीनी आंबाबाईच्या रथोत्सवाची १०० वर्षांची परंपरा

Mahesh Gaikwad

आंबाबाईचा रथोत्सव

अनेक वर्षांच्या परंपरेनुसार चैत्र महिन्यातील जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरच्या आंबाबाईच्या रथोत्सवाचा सोहळा साजरा होतो.

Ambabai Rathotsav | Photo - Sharad Patil

१०० वर्षांची परंपरा

आंबाबाईच्या रथोत्सवाला १०० वर्षांची परंपरा असून हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.

Ambabai Rathotsav | Photo - Sharad Patil

रथोत्सव सोहळा

चैत्र महिन्याच्या दुसऱ्या दिशी वर्षातून एकदा आंबाबाई नगगरवासियांच्या भेटीसाठी मंदीराबाहेर येते, अशी याची मान्यता आहे.

Ambabai Rathotsav | Photo - Sharad Patil

सागवानी रथ

देवस्थान समितीने गेल्यावर्षी रथोत्सवासाठी नवा सागवानी रथ तयार केला आहे. या रथात आंबाबाई विराजमान होत नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते.

Ambabai Rathotsav | Photo - Sharad Patil

भाविकांची गर्दी

रथोत्सवाचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची अलोट गर्दी होते. या दरम्यान मंदीर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जातो.

Ambabai Rathotsav | Photo - Sharad Patil

फुलांच्या पायघड्या

रथोत्सवाच्या मार्गावर रांगोळी, फुलांच्या पायघड्या घालण्यात होत्या. त्यावरून मानकऱ्यांनी रथ मार्गस्थ केला. यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी रथावर पुष्पवृष्टी केली.

Ambabai Rathotsav | Photo - Sharad Patil

ढोलपथक

रथासमोर ढोलपथक, पोलिस बँड पथक, पारंपरिक बँड पथकांनी सूर-तालाची साथ देत रथोत्सव सुरेल केला. रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने रथोत्सव व परिसर उजळून निघाला.

Ambabai Rathotsav | Photo - Sharad Patil

विद्युत रोषणाई

रथाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यामुळे रथातील आंबाबाईच्या मुर्तीचे मोहक रुप विलोभनिय दिसत होते.

Ambabai Rathotsav | Photo - Sharad Patil

देवीची आरती

देवीची आरती करून तोफेची सलामी दिल्यानंतर रथोत्सवाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. रथापुढे मानाचा घोडा, चोपदार होते.

Ambabai Rathotsav | Photo - Sharad Patil