Germination Test : बियाण्याची उगवणक्षमता तपासणी करताना...

Team Agrowon

पेरणीसाठी बियाण्यांचे नियोजन केले जात आहे. मात्र पूर्वतयारीमध्ये बियाण्याचे उगवणक्षमता तपासणी करून घेणेही तितकेच गरजेचे असते.

Soybean Seed | Agrowon

अनेक शेतकरी स्वतःचे किंवा घरगुती उपलब्ध धान्यांचा वापर बियाणे म्हणून पेरणीसाठी करतात. मात्र असे बियाणे पेरणीसाठी वापरण्यापूर्वी उगवण क्षमता, शुद्धता, अन्य जातींच्या पिकांचे भेसळ, रोगट किंवा फुटके बियाणे याकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांची उगवण चांगली होत नाही.

Soybean Seed | Agrowon

बियाण्याच्या एखाद्या लॉटची उगवणक्षमता तपासण्यासाठी त्यातील कमीत कमी ४०० बी तपासावे लागतात.

Soybean Seed | Agrowon

उगवणक्षमता तपासण्यासाठी घेतलेल्या बियाण्यांवर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी. ते शुद्ध बियाण्यातून घेतलेले असावे.

Soybean Seed | Agrowon

शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाण्याची पेरणीपूर्व उगवणक्षमता चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पेरणी करतेवेळी बियाण्याचे एकरी प्रमाण निश्‍चित करता येते.

Soybean Seed | Agrowon

कागदामध्ये बियाणे ठेवून उगवणक्षमता तपासणे या पद्धतीमध्ये दोन कागदामध्ये बियाणे ठेवून उगवणक्षमता तपासली जाते.

Mung | Agrowon

शोषकागदावर बियाणे ठेवणे या पद्धतीमध्ये लहान आकाराच्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासता येते.

Jowar | Agrowon