Ripe Mango : असा ओळखा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा

Team Agrowon

उत्तम दर मिळण्याच्या आशेने आंबा काढणीची घाई करणे किंवा ते आरोग्यासाठी हानिकारक रसायनाच्या साह्याने पिकविण्याचे प्रकार काही शेतकरी व व्यापारी मंडळी करत असतात.

Ripe Mango | Agrowon

या रसायनाच्या पुड्या बांधून आंब्यामध्ये ठेवल्या जातात. त्यातून बाहेर पडणाऱ्या ॲसिटिलिन वायूमुळे अगदी ३५ ते ४० तासांत हिरव्या आंब्याला फक्त वरून पिवळा रंग येतो. मात्र तो आतून पक्व असतोच असे नाही!

Ripe Mango | Agrowon

फळे वरून आकर्षक दिसत असली तरी आतून कच्ची, आंबट किंवा बेचव असतात. त्यात ही रसायने आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून, कर्करोगकारक आहेत.

Ripe Mango | Agrowon

नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा विशेषतः देठाजवळ थोडासा खड्डा पडलेला असून, बाजूचे खांदे वर आलेली असतात.

Ripe Mango | Agrowon

फळाची चोच सर्वसाधारणतः बोथट असते.

Ripe Mango | Agrowon

आंब्याला भरीव आकार आलेला दिसतो.

Ripe Mango | Agrowon

त्यावरील लेंटीसेलचे स्पॉटसुद्धा ठळक असतात.

Ripe Mango | Agrowon

Turmeric Fertilizer Management : हळदीला द्या ठिबक सिंचनातून खते