Seed Treatment Care: बीजप्रक्रिया करताना हे ७ नियम विसरू नका!

Swarali Pawar

बीजप्रक्रिया का महत्त्वाची?

बीजप्रक्रियेमुळे बियाण्यांचे रोग व किडींपासून संरक्षण होते. त्यामुळे उगवण चांगली होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

Safe Seed Treatment | Agrowon

योग्य औषधे निवडा

नेहमी शिफारस केलेली बुरशीनाशके, कीटकनाशके आणि जैविक खतेच वापरा. चुकीचे प्रमाण वापरल्यास अपेक्षित फायदा मिळत नाही.

Safe Seed Treatment | Agrowon

सावलीतच प्रक्रिया करा

बीजप्रक्रिया स्वच्छ जागेत आणि सावलीत करावी. उन्हात केल्यास जैविक घटकांची कार्यक्षमता कमी होऊ शकते.

Safe Seed Treatment | Agrowon

FIR नियम पाळा

प्रथम बुरशीनाशक, नंतर कीटकनाशक आणि शेवटी जैविक खतांची प्रक्रिया करा. हा क्रम पाळल्यास बीजप्रक्रिया अधिक प्रभावी ठरते.

Safe Seed Treatment | Agrowon

हाताने चोळू नका

औषधे मिसळताना बियाणे हाताने चोळू नका. पिशवी किंवा कापडाच्या मदतीने एकसारखे मिसळा.

Safe Seed Treatment | Agrowon

वेळेत पेरणी करा

जैविक खतांची प्रक्रिया केल्यानंतर शक्यतो 3 तासांच्या आत पेरणी करा. त्यामुळे उपयुक्त सूक्ष्मजीव जिवंत राहतात.

Safe Seed Treatment | Agrowon

स्वतःची सुरक्षा जपा

बीजप्रक्रिया करताना हातमोजे, मास्क आणि चष्मा वापरा. तसेच उरलेले प्रक्रिया केलेले बियाणे सुरक्षित ठिकाणी वेगळे साठवा.

Safe Seed Treatment | Agrowon

तयार बियाण्यांनाही काळजी हवी

बाजारातील अनेक प्रमाणित बियाण्यांवर बुरशीनाशक व कीटकनाशक प्रक्रिया आधीच केलेली असते. अशावेळी फक्त जैविक खतांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.

Safe Seed Treatment | Agrowon

Soil Moisture: मान्सून आला? थांबा! पेरणीयोग्य ओलावा ओळखा!

Agrowon
अधिक माहितीसाठी...